नगर पंचायत चामोर्शी येथील जाहिरात बॅनर व पोष्टर वर कर आकारणी करण्यात यावे अवैध बॅनर धारकांवर कारवाई करा
नगरसेवक आशीष पिपरे यांची मागणी.
चामोर्शी :नगरपंचायत येथे गेल्या अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्ते व इतर जाहिरात कंपनी द्वारे दररोज विविध जाहिरात प्रसिद्ध करून नगरपंचायत चामोर्शी शहरास विद्रूप करण्याचा कार्यक्रम आहे* *विविध जाहिरात कंपनी या जाहिरातीच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपये कमवीत आहेत परंतु या जाहिरातीचा नगरपंचायतला कुठलाच फायदा नाही नियमानुसार सदर बॅनर व पोष्टर चे नगर पंचायत येथे स्कवे फूट प्रमाणे बॅनर पोष्टर लावल्या दिवसा पासून कर आकारणी पावती फाळणे गरजेचे असताना नगर पंचायतचा दुर्लक्ष असल्याने सदर प्रकार सुरू आहे , चोहीकडे जाहिरात बॅनर व पोष्टर लावल्या मुळे संपूर्ण चामोर्शी शहर विद्रूप दिसत आहे, व या जाहिरातीचा
नगर पंचायत चामोर्शीला कुठलाच उत्पन्न मिळत नाही या आधी लावण्यात येणाऱ्या जाहिरात बॅनर पोष्टर वर कर आकारणी करण्यात आली त्यावेळी अल्पशा
दिवसात राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून नगर पंचायतला चांगलाच उत्पन्न प्राप्त झाला होता
परंतु नगर पंचायत चामोर्शी यांच्या दुर्लक्ष पणामुळे नगर पंचायत चा नियमित येणारा लाखो रुपयांचा कर दरवर्षी बुडत आहे तरी शहरात लावण्यात येणाऱ्या समस्त बॅनर पोष्टर वर कर आकारणी करण्यात यावे व नगर पंचायत नाहरकत प्रमाणपत्र व कर भरल्याशिवाय बॅनर पोष्टर
लावणाऱ्या जाहिरात कंपनी व राजकीय पक्ष कार्यकर्ते यांच्या विरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी सुचना नगर पंचायत नगरसेवक आशीष पिपरे , नगरसेविका सोनाली पिपरे व रमेश अधिकारी यांनी केले आहे.