क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कोनसरी येथे मोठ्या उत्साहात साजरी
चामोर्शी: गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण व पुजन करुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे आज पार पाडला. समाजातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गावातून रॅली काढली होती यावेळी खासदार अशोक नेते.प्रकाश गेडाम प्रदेश संघटन सरचिटणीस भाजपा एसटी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांनी यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन केले यावेळी स्वप्नील वरघंटे, प्रदेश सदस्य भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश. ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच, तथा माळी समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी गावकरी प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.सुरजागड प्रकल्प येथील कोनसरी प्रकल्पात स्थानिक बेरोजगारांना प्रकल्पामध्ये नोकरी देण्यात यावी आजूबाजूच्या जमिनीला शासन निर्णयाप्रमाणे चांगला भाव देण्यात यावा अशा अनेक मागण्या खासदार अशोक नेते यांच्यासमोर जनतेने मांडल्या लवकरच जिल्हाधिकारी या संदर्भात बैठक लावणार असून आपल्याला न्याय देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन अशोक नेते यांनी दिल्या.