महिलांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा अंगीकार करावा.:माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे प्रतिपादन
गडचिरोली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम
गडचिरोली:- दि. 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवुन दिला. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या शिक्षणासाठी समर्पित केले, अतिशय हाल अपेष्टा सहन करून अतीशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचे संपूर्ण जिवन संघर्षमय राहिले. त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आज महिलाना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे .त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अनमोल असून महिलांनी त्यांच्या विचारांचा व कार्याचा अंगीकार करावा,असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा भाजप महिला आघाडी ओबीसी मोर्चाच्या जिल्हा संयोजिका योगीताताई पिपरे यांनी केले. गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात दि 3 जानेवारी 2023 रोजी आयोजित सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लताताई लाटकर ,माजी नगरसेविका अल्काताई पोहनकर, भाजपा ओबीसी महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अर्चना निंबोड, महिला आघाडी आदिवासी मोर्चाच्या शहराध्यक्ष भावना हजारे, शहर महामंत्री रश्मी बाणमारे, शहर सचिव कोमल बारसागडे, अंजली उरकुडे, पिंकी बैस उपस्थित होते.
याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली