खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते वडसा (देसाईगंज)येथे सिकंदराबाद, दरभंगा या सुपर फास्ट, एक्सप्रेस ट्रेनचा स्टॉपेजस थांबा चा उद्घाटन सोहळा
हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ करून संपन्न झाला.
—————————————-
वडसा:-आज दिं.०४ जानेवारी खासदार अशोक नेते यांनी रेल्वे संबंधित दिं.११-०८-२०२२ च्या दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने वडसा येथे सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनचे स्टॉपेजस (थांबा) वडसा जंक्शन स्टेशनवर वर गाडी संख्या 17007/08 सिकंदराबाद दरभंगा एक्सप्रेस या सुपर फास्ट ट्रेनचे स्टॉपेजेस( थांबा ) केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विन जी वैष्णव यांनी मंजुर केला
या अनुषंगाने सुपरफास्ट ट्रेनच्या स्टॉपेजेस च्या मागणीनुसार जनतेच्या रेल्वे संबंधि समस्या व प्रवासाच्या सोयी सुविधेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय रेल्वेमंत्री यांना निवेदनाद्वारे व पाठपुराव्याने सुपरफास्ट ट्रेनचे स्टॉपेज (थांबा) मार्गी लावण्यात यश आले आहे. यासाठी गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते आज दिं ०४ जानेवारी २०२३ ला हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ करण्यात आला
याप्रसंगी खासदार अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष किसन नागदेवते,ता.अध्यक्ष राजु जेठानी, जि.प.माजी सभापती नाना नाकाडे,देवरीचे शिक्षण महर्षी तथा भाजपाचे जेष्ठ नेते झामसिंग येरणे,DRM दक्षिण पूर्व मध्य रेलचे विभागीय प्रबंधक मनिंदर उप्पल,सहाय्यक प्रबंधक नागपुर अविनाश कुमार आनंद,सहाय्यक प्रबंधक एस.एन. नामदेव,ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पारधी, माजी न्यायाधीश ज्ञानदेव परशुरामकर, लक्ष्मण रामण,संतोष सामदासन, राजकुमार तिवारी, तसेच भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,बंधू आणि भगनींनी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.