एसटी बसने दारूची तस्करी : दोघांना अटक -गडचिरोली पोलिस व मुक्तिपथची कारवाई

0
68

एसटी बसने दारूची तस्करी : दोघांना अटक
-गडचिरोली पोलिस व मुक्तिपथची कारवाई
गडचिरोली: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडून १२ हजारांची देशी दारू जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने बसडेपो परिसरात केली. याप्रकरणी गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ सेन व प्रकाश मारभते दोन्ही रा. रामनगर, गडचिरोली असे आरोपींचे नाव आहेत.
गडचिरोली शहरातील अवैध दारूविक्रीवर अंकुश लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. आतापर्यंत अनेक दारूविक्रेत्यांकडून मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. तरीसुद्धा काही विक्रेते दारू विक्री सुरु असलेल्या जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक करीत असल्याचे दिसून येते. सोमवारी एसटी महामंडळाच्या बसने देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तिपथच्या तालुका चमूने गडचिरोली बस डेपोमध्ये पाळत ठेवली. बसमधून उतरणाऱ्या दोन संशयितांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे ९० एमएलच्या २०० निपा देशी दारू आढळून आली. पोलिसांनी १२ हजारांची अवैध दारू जप्त करीत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे बसमधून दारूची तस्करी करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार धनराज चौधरी, स्वप्नील कुळावले, सुजाता ठोंबरे व मुक्तिपथचे तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here