युवा क्रिकेट क्लब देऊळगांव ता.आरमोरी जि.गडचिरोली यांचे सौजन्याने भव्य टेनिस बॉल हॉप पिच क्रिकेट स्पर्धा देऊळगांव चषकाचे उदघाटन खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते संपन्न
शाळेच्या विद्याथी बालकांनी लेझीम वाजवून कार्यक्रमाची सुरुवात करून शोभा वाढवली
दिं ०५ जानेवारी २०२३.आरमोरी:- युवा क्रिकेट क्लब देऊळगांव यांच्या सौजन्याने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना युवकाने मैदानी खेळ खेळावे.खेळामुळे युवकांचे आरोग्य हेल्थे चांगले राहते.खेळ खेळतांना एकाग्रतेने,आनंदाने, हसतमुखाने, खेळ खेळावे.प्रत्येक चमूने आपण जिंकले पाहिजे असा आत्मविश्वास ठेवून खेळ खेळावे. खेळामध्ये ,यश अपयश येतात,अपयश आले तरी खचून न जाता,दुसऱ्यांदा जिद्दीने खेळ खेळून विजय प्राप्त करावे.असे प्रतिपादन याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.पुढे बोलतांना आपण दिलेल्या निवेदनाचा सुद्धा सकारात्मक विचार करण्यात येईल असे विचार युवकांना मार्गदर्शन करतांना खासदार अशोक नेते यांनी केले.यावेळी खासदार नेते साहेबांनी क्रिकेट खेळून बॅटिंगचा आस्वाद घेत क्रिकेट खेळण्याचा आनंद व्यक्त केला.तसेच लेझीम वाजवणाऱ्या विद्यार्थी बालकांना खासदार नेते साहेब यांच्या हस्ते कंपास बॉक्सचे सुद्धा वाटप करण्यात आले.या प्रसंगी खासदार अशोक नेते,जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे,ठेकेदार माणिकराव येंचिलवार,सरपंच शामादेवी सहारे, उपसरपंच वंदनाताई कामतकर, माजी.पं.स.स.बंडूजी बनकर, प्राचार्य चौधरी , जांबुळे ग्रा.स. हाडगे ,घोडसे ,धुर्वे, ऊईके,बोंधरे,धारणे, मंडळाचे धिरज हाडगे,प्रविण कुरुडकार,दिपक नंनावरे,मनोज बिसेन,अवीनाश पाथर,छकुल क्षीरसागर, मुकेश टेकाम,भुषण कांबळे,समिर गरमळे,तसेच मंडळाचे सदस्य गण व विद्यार्थी, विद्यार्थिनी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.