बंडूजी कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा
गडचिरोली:-सोनार समाज गडचिरोली च्या वतीने आज दिनांक 6 जानेवारी ला चामोर्शी रोड वरील क्रिष्णा बेकरी येते सोनार समाजाचे अध्यक्ष श्री बंडू कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत दिनांक 8 फरवरी 2023 ला होणाऱ्या परमपूज्य श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या चे आयोजन करण्यात आले आहेत.त्या कार्यक्रम बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.या पुण्यतिथी सोहळ्यात साउंड सर्व्हिस व बैठक व्यवस्था,पालखी व कलश यात्रा नियोजन,अल्पोपहार,भोजन पाणी व्यवस्था,स्वागत समिती,कार्यक्रमाचे चित्रीकरण करणे,कार्यक्रम व मंच सजावट करणे अश्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
त्याच प्रमाणे सोनार समाजातील महिलांचा वाण व हळदी कुंकवाचा कार्यक्रम हे दिनांक 28 जानेवारी ला हनुमान ट्रेडर्स चामोर्शी रोड वरील मागील ओपनस्पेस मध्ये होणार असून या कार्यक्रमात बहुसंख्य सोनार समाजातील महिलांनी उपस्थित राहण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली
या सहविचार सभेला सोनार समाजा संस्थेचे अध्यक्ष बंडू कारेमोरे,माजी प्राचार्य तथा सल्लागार समितीचे सदस्य नामदेव काळबांधे, उपाध्यक्ष डेडुजी बेहरे,सचिव अशोक हाडगे,सदस्य प्रा.राकेश इन्कने, रमेश भरणे,पुरुषोत्तम कुर्वे,अरुण पोगळे, सोनार समाजाचे युवक अध्यक्ष गजेंद्र डोमळे, त्रिमूर्ती डोमळे,पंकज हर्षे हे उपस्थित होते.