आमदार डॉक्टर देवराव होळी यांना शिक्षक संघटनेचे निवेदन
वयोमर्यादा ओलांडलेल्या तासिका तत्त्वावरील आदिवासीं विकास विभागाप्रमाने कायम स्वरुपी सेवेत सामावून घ्यावे अशी ही मागणी
गडचिरोली:- ७ जाने. जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना नियमित स्वरूपात वेतन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबांना प्रचंड आर्थिक व मानसिक संकटांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांचे मानधन किमान ३५ ते ४० हजार रुपये पर्यंत निश्चित करून त्यांना मानधन लागू करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आले
यावेळी निवेदन देताना नेत्रा पोटावार, हिनलता मंडळ, संगिता मोटघरे, काजल दास, दिलीप कुनघाडकर, जगदीश देशमुख, पियुष आक्केवार, इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील असंख्य जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने व शासनाकडून ती अजूनही भरण्यात न आल्याने अशा शाळांमध्ये तासिका तत्त्वावर या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. मात्र या शिक्षकांना देण्यात येणारे तासिका तत्त्वावरील वेतन नियमित दिले जात नाही. आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेतील शिक्षकांप्रमाणेच यांनाही शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे . तोपर्यंत किमान ३५ ते ४० हजार रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्याकडे केलेली आहे.