कोटगल बॅरेजला भेट देऊन केली कामाच्या प्रगतीपथाची पाहणी
बॅरेजच्या कामाची गती संथ असल्याने व्यक्त केली नाराजी
४३ पिलर असणाऱ्या कोटगल बॅरेजचे आत्तापर्यंत ८ पिल्लर चे काम पूर्ण
गडचिरोली:-नांक 7 जाणे.आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी, गडचिरोली शहर वासीयांच्या पिण्याची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटावी यासाठी अथक प्रयत्न करून आणलेले गडचिरोली जवळील वैनगंगा नदीवरील कोटगल बॅरेज या सिंचन प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कोटगल बॅरेजच्या प्रशासनाला केली आहे.
कोटगल बॅरेजला भेट देऊन केली कामाच्या प्रगतीपथाची पाहणी केली असता कामाची गती संथ असल्याने त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
४३ पिलर असणाऱ्या कोटगल बॅरेजचे आत्तापर्यंत ८ पिल्लर चे काम पूर्ण झाले असून दोन्ही बाजूच्या डिव्हाइड वॉलाचे कामही पूर्ण झालेले आहे. तसेच सरफेसिंग लेवल काँक्रिटीकरण चे कामही झालेले आहे.
कोटगल बॅरेजच्या कामाच्या पूर्णत्वासाठी येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला आपण बाहेर काढून पुढे जाऊ यासाठी आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत या क्षेत्राचा आमदार या नात्याने आपण करण्यास तत्पर असल्याचे प्रतिपादन या भेटीच्या प्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले व काम तातडीने पूर्ण करण्याच्या आवश्यक त्या सूचना त्यांनी कोटगल बॅरेजच्या प्रशासनाला दिल्या.