तेली समाजाला जागृत करण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घ्यावा- माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे

0
53

आरमोरी येथे तेली समाज मेळावा, गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

आरमोरी :- दि. 9 जाने.तेली समाज गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे मात्र आपले समाज बांधव एकत्र येत नसल्याने अनेक कामे होऊ शकत नाही समाजाला जागृत होऊन एकत्र येणे गरजेचे असून त्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही तसेच ओबीसींचे प्रश्न सुद्धा सुटू शकत नाही त्यामुळे समाज बांधवांनी एकत्र येऊन ओबीसी समाजाच्या समस्यां व अडचणीसाठी जागृत होणे आवश्यक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका , संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा नारा दिला होता त्यांचे विचार अंगीकारून समाजाला संघटीत होण्याची गरज असून आजच्या तरुण पिढीने चांगले शिक्षण घेऊन समाजाला चांगला मार्ग दाखवणे आवश्यक असून समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले. आरमोरी येथे आयोजित तेली समाज वधू-वर परिचय मेळावा तसेच ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
श्री संताजी बहुउदेशीय सेवा मंडळ आरमोरी यांचे सौजन्याने दिनांक ०८ जाने.२०२३ रोजी संताजी ग्राउंड कोसा विभाग केंद्राजवळ आरमोरी येथे तेली समाज वधु वर परीचय मेळावा तथा तेली समाज मेळावा व गुणवंत विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला.

मेळाव्याचे उदघाटन माजी नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे होते तर सत्कार मूर्ती म्हणून संताजी सोशल मंडळ, ब्रम्हपुरीचे अध्यक्ष डॉ सतीश कावडे, संताजी भवनासाठी जागा दान देणारे आरमोरीचे माजी सरपंच श्री बुधाजी किरमे गोपीचंद चांदेवार प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे, प्राचार्य पी. आर.आकरे, माजी पसं सभापती परशराम जी टिकले, डॉ. संजय सुपारे,उपसरपंच भास्करराव बोडणे, अशोक कुरजेकर ,मिलिंद खोब्रागडे, विलास पारधी, भाग्यश्री खोब्रागडे, सुनीता चांदेवार, निर्मला किरमे, प्रामुख्याने उपस्थित होते.
या समाज मेळाव्यात तेली समाजातील ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ व्यापारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here