गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्र मार्फत आलेल्या कर्ज प्रकरणांना बँकांनी तत्काळ कर्ज पुरवठा करावा!

0
39

बँका जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पाठवण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांना दाखवतात कचरा पेटी
बेरोजगार युवकांची हेळसांड खपवून घेणार नाही
आशीष पिपरे नगरसेवक न, प, चामोर्शी

चामोर्शी:-दिनांक 10 जानेवारी गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यातील शेकडो बेरोजगार युवकांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सबंधित बँकेस कर्ज पुरवठा करण्यासाठी केसेस पाठवले आहेत परंतु सबंधित बँका सुशिक्षित  बेरोजगारांना कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ करतात व हेलपाटे मारायला लावतात शेवटी सुशिक्षित बेरोजगार युवक हेलपाटे मारून थकतो व उद्योग स्थापन करण्याच्या विचार सोडून देतो
गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, बँक ऑफ इंडिया,स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक सदर बँका सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देण्यास नेहमीच नकारार्थी आहेत ,या विषयावर अनेकदा तक्रार करूनही कुणीही लक्ष देण्यास तयार नाही व सबंधित बँकांच्या मनमानीला जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार कंटाळले आहेत परंतु यांचा वाली कुणीच नाही?परंतु आता या बँकांची मनमानी कारभार आता खपऊन घेणार नाही
व या विरोधात आता गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या सुशिक्षित बेरोजगारांचे कर्ज देण्यास ब्यांकानी टाळाटाळ करीत आहेत त्या समस्त बेरोजगारांना घेऊन आपण स्वतः पुढाकार घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांची होत असलेल्या हेळसांड बद्दल आपण कळवणार आहोत व जोपर्यंत या सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही असे प्रतिपादन येथील नगरसेवक आशीष  पिपरे , रमेश अधिकारी युवा नेते निखील धोडरे ,भाजपा बूथ प्रमुख मास्टर विनोद किरमे यांनी केले आज याबाबत जयनगर तालुका चामोर्शी येथील सुशिक्षित बेरोजगारांच्या शिष्टमंडळाने अनुप भक्त व येथील युवकांनी शहरात आयोजीत जनता दरबारआधी निवेदन दिले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here