सुरजागड लोहप्रकल्पामुळे जिल्ह्यातील उद्योग निर्मितीस चालना : जिल्हाधिकारी संजय मिणा

0
96

अनेक बेरोजगारांच्या हातांना मिळाले काम, तरूणांच्या आर्थिक उत्पन्नात भर

गडचिरोली : नक्षलग्रस्त व उद्योगविरहित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला सुरजागड लोह प्रकल्पामुळे नवी संजीवनी मिळाली आहे. औद्योगिक क्षेत्रात जिल्ह्याची  प्रगतीने वाटचाल सुरू असून सुरजागड प्रकल्पामुळे उद्योग निर्मितीस चालना मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तरूण बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. एटापल्ली तालुक्यासह जिल्ह्यातील तरूणांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सुरजागड प्रकल्पामुळे जिल्ह्यातील उद्योग निर्मितीस चालना मिळाली असून अनेक बेरोजगारांच्या हातांना काम मिळाले असल्याचे मत गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात एकही मोठे उद्योग नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी व तरूण पूर्णत: शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. लॉयड मेटल्स कंपनीने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात असलेल्या सुरजागड लोहखनिज उत्खननास सुरवात केली. हेच उदाहरण डोळ्यासमोर ठेवून अनेक कंपन्या जिल्ह्यात काम करण्यास तयार झाल्या आहेत. त्यामुळे  जिल्ह्याची उद्योगविरहित जिल्हा म्हणून ओळख काहीअंशी पुसल्या जात आहे. जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नसल्याने बेरोजगारांची फौज तयार झाली होती. मात्र, लॉयड मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेटने जेव्हापासून लोहखनिज उत्खननास सुरवात केली तेव्हापासून बेरोजगारांच्या संख्येत कमालीची घट दिसून येत आहे. सुरजागड प्रकल्पामुळे जिल्ह्यातील हजारो कुशल व अकुशल कामगारांना या ठिकाणी काम मिळाल्याने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासास गती मिळाली आहे. सुरजागड लोहखनिज उत्खननामुळे हजारो रिकाम्या हातांना काम मिळाल्याने स्थानिक बेरोजगारांच्या आशा आकांक्षा पल्लवीत झाल्या आहेत. अनेक कंपन्या जिल्ह्यात काम करण्यास उत्सूक असून जिल्ह्याला औद्योगिक क्षेत्रात नवी ओळख निर्माण होण्यास गती मिळणार आहे. सोबतच अनेक तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याचे मत जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी व्यक्त केले.

स्किल डेव्हरपमेंटवर काम सुरू
एटापल्तली परिसरातील आदिवासी तरुणांना चांगल्या दर्जाचे काम मिळावे व त्यांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी लॉयड मेंटल्स कंपनीने स्किल डेव्हलपमेंटचे काम सुरू केले असून याचा फायदा अनेक तरूणांना होणार आहे. स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षणामुळे अनेक आदिवासी तरूणांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. त्यामुळे येथील तरूणांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. 

कोनसरी स्टिल प्लँटची निर्मिती 
उद्योगविरहित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याची औद्योगिक क्षेत्राकडे वाटचाल सुरू आहे. याचे ज्वलंत उहादरण म्हणजे चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील स्टिल प्लँटची निमिती आहे. स्टिल प्लँटच्या उद्योगामुळे अनेक तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार असून जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात या प्लॉन्टचा मोठा वाटा असणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here