उभ्या ट्रॅव्हल्समुळे दुचाकीचा अपघात; दोघे किरकोळ जखमी

0
125

काहीकाळ वाहतुक ठप्प

गडचिरोली : चंद्रपूर मार्गावरील महिला महाविद्यालयाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या पाच ते सहा ट्रव्हल्समुळे दोन दुचाकी वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज 10 जानेवारीला रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. अपघातातील जखमींची नावे कळू शकली नाही. या अपघातामुळे चंद्रपूर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा घटनास्थळी दाखल होऊन वाहतुक सुरळीत करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्समुळे हा अपघात घडून आल्याने जमावाने ट्रॅव्हलस मालकांविरोधात संताप व्यक्त केला.
सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर मार्गावरील महिला महाविद्यालय जवळ  रस्त्याच्या कडेला पाच ते सहा ट्रॅव्हलस नेहमीच उभ्या असतात. उभ्या ट्रॅव्हलसमुळे मार्गक्रमण करीत असताना समोरील वाहन दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात घडत असतात. अपघात टाळण्यासाठी  राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले. मात्र, रस्ता रुंदीकरणाचा दुरूपयोग करीत काही ट्रॅव्हलधारकांनी रस्त्यावरच आपली वाहनी उभी करीत असतात. रात्रोच्या सुमारास रस्त्यावर उभ्यास असलेल्या वाहनांचा वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघात घडत असतात.  रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनधारक मालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरवासियांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here