गडचिरोली शहरातील राष्ट्रीय महामार्गालगतथचे अतिक्रमण हटविन्याची केली मागणी.
दिनांक 12जानेवारी
गडचिरोली शहरातुन आरमोरी चामोर्शी धानोरा आणि मूल हे चार महामार्ग जातात याच महामार्गाला लागून भरपूर दुकान हे अतिक्रमनाच्या विळख्यात सापडले आहेत. अतिक्रमनामुळे मागील हप्त्यात वंजारी समाजाच्या भगिनीचा अपघात होऊन मृत्यू झाला होता याच मुद्याला हात घालून वंजारी समाज सेवा परिषद गडचिरोली च्या वतीने आज गडचिरोली चे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे पुढे ते निवेदनात म्हटले आहे की गडचिरोली शहरामध्ये शहराच्या मध्यभागातून चारही बाजूने राष्ट्रीय महामार्ग जातो या महामार्गाला लागूनच दुकान आहेत, दुकानासमोर खूप मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहन उभे असतात
अतिक्रमण अपघाताला निमंत्रण देत आहेत. दिनांक ७ जानेवारीला झालेल्या अपघातामध्ये आमची भगिनी मृत पावली.मागच्या वर्षी सुद्धा याच कारणामुळे अपघात झाले असून काही लोकांचा विनाकारण मृत्यू झाले. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण कारवाही कराल अशी निवेदनातून मागणी वंजारी समाजाने केली आहे.चंद्रशेखर भडांगे,दिलीप आखाडे, उमेश आखाडे, निखिल गोरे,नरेश कहुरके,अनूप साळवे,स्वरूप तारगे, पीयूष आखाडे, सारंग करपे,अमोल आखाडे, सारंग हेमके,रोशन हेमके,विजय साळवे हे उपस्थित होते.