वुशू क्रीडाप्रकारात कु. सेजल किशोर गद्देवारला सुवर्णपदक

0
41

सेजल ठरली जिल्ह्यातील पहिली खेळाडू; विविध खेळातील आजपर्यंतचा 49 सुवर्णपदक

डचिरोली : महाराष्ट्र ऑल्मपिक असोसिएशन तथा महाराषट्र शासन क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे 12 जानेवारीला महाराष्ट्र राज्य ऑल्मपिक स्पर्धा 2022-23 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वुशू या क्रीडाप्रकारात कु. सेजल किशोर गद्देवार हिने सुवर्णपदक पटकाविला. त्यामुळे ती जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. तीच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक संदिप पेदापल्लीवार व आईला दिले आहे.

आज ता. 13 संध्याकाळी कोटगल ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत समारंभाचे आयोजन करून सेजलचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच ममता दुधबावरे, उपसरपंच तेजप्रभा पंकज भाेयर, उर्मिला भारत भोयर, प्रिता कृष्णा खोब्रागडे, विश्वनाथ भोयर, लोमेश भोयर, दिलीप कोरेवार, पोलिस पाटील हेमंत मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोहन ठाकरे, उमेश मोटघरे, गणेश शिंगाळे, नितेश मल्लेलवार व गावकरी उपस्थित होते.

सेजलने प्राप्त केली विविध खेळातील आजपर्यंत 49 पदक
गडचिरोली येथील गव्हरमेंट सायन्स कॉलेज मध्ये बीएससी िद्वतीय वर्षाला शिकत असलेली सेजल गद्देवारला आजपर्यंत विविध खेळप्रकारातील 49 पदक प्राप्त केले आहे. 28 सुवर्णपदकांसह सिल्हवर आणि बांन्झ पदक अशी 49 पदक प्राप्त मिळविले आहे. वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच खेळामध्ये रूची असलेल्या सेजलने वुशू क्रीडाप्रकारात सुवर्णपदकाची कमाई करून जिल्ह्याचा मान शिरपेचात उंचावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here