गडचिरोली:-तकारदार यांनी ग्रामपंचायत मुरगांव अंतर्गत कोकडकसा समाजमंदीर ते साधु पदा यांच्या घरापर्यंतचे सीसी रोडचे बांधकाम पूर्ण केले होते,सीसी रोडच्या बांधकामाच्या चेकवर स्वाक्षरी करुन देण्याचे कामाकरीता मुरगांव ता. धानोरा जिल्हा गडचिरोली ग्रामपंचायतचे सरंपच श्री मारोती रावजी गेडाम वय ५० वर्षे, यांनी ९०,००० रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती, तडजोडीअंती ७५,००० रुपये लाच रक्कम स्थानिक इंदिरा गांधी चौकात रस्त्याच्या बाजूला स्विकारतांना आरोपीला रंगेहाथ पकडन्यात आले.
आरोपी वर कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांचे पर्यवेक्षणात पो.नि. शिवाजी राठोड, सफो प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु घोटे, नापोशि राजु पदमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, स्वप्निल बांबोळे, किशोर जौंजारकर, पोशि संदीप घोरमोडे, किशोर ठाकुर, संदिप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री, जोत्सना वसाके, चापोहवा तुळशीराम नवघरे यांनी पूर्ण केली.