चंद्रपूर: आजच्या धावपळीच्या जीवनात ‘हम भी कसी से कम नही’ या म्हणीला सार्थकी ठरवून लिफ्ट मशीन चालवत मानसालाही लाजवेल अशी कामगिरी श्रद्धाने करून दाखविली आहे. मानसाच्या खांद्याला ,खांदा लावून काम करण्याचा आत्मविश्वास तीने दाखविला आहे.
पितृछाया हरपलेल्या वडील असून सुद्धा नसल्या सारखे आहे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील टेंबुरवाई आणि सध्या आंजोळी म्हणजे राजुरा येथील सोमनाथपुर येथे वास्तव्यास राहणारी आदिवासी समाजात जन्माला आलेली श्रद्धा उर्फ नंदिनी भारत मडावी घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे दहावीचे शिक्षण पूर्ण करून शिक्षणाला पूर्णविराम दिला. वडिल जीवंत असतानाही आई व बहिनीला सोडून गेल्यामुळे लहान बहिणीच्या शिक्षणासोबतच कुटुंबाचा गाळा हाकण्याची जिम्मेदारी श्रद्धावर येवून ठेपली. परिस्थितीला न डगमगता लिफ्ट मशीन चालवून कुटुंबाची जिम्मेदारी श्रद्धा मोठ्या हिमतीने पार पाडत आहे.
कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्याने श्रद्धाला दहावीनंतरचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. मात्र, लहान बहिणीच्या शिक्षणासाठी कुठलीही कसूर सोडली नाही. परिस्थिती बदलविण्यासाठी श्रद्धाने आपल्या बहिनीला 11 व्या वर्गात प्रवेश करून दिला. कठिण परिस्थितीला मात देत सुखी संसाराचा गाळा समाधानाने हाकत आहे.
श्रद्धा ही चंद्रपूर जिल्ह्यातील लिफ्ट मशीन चालविणारी एकमेव मुलगी आहे. त्यामुळे तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रद्धा तीन वर्षांपासून सतत लिफ्ट मशीन चालवत असून सुरवातीला 300 रुपये मजुरी मिळायची. लिफ्ट मशीन चालविण्याचे कौशल्य असल्याने आज ती 1 हजार रुपये दिवसाकाठी मिळवतो. तीची आई अरुणा व लहाण बहिण पूजा असा श्रद्धाचा परिवार आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे कोमेजलेल्या चेह-यावर श्रद्धाने हसू फुलविले आहे.
.…………………………….
श्रद्धाचा होणार सत्कार
परिस्थितीला न डगमगता श्रद्धाचे लिफ्ट चालविण्याचे कौशल्य बघून भारतीय मानवाधिकार परिषदे तर्फे होणाऱ्या गडचिरोली येथील कार्यक्रमात येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिनी श्रद्धाला पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे यांनी दिली आहे.
……………………………………