शनिवारी गडचिरोलीत डिजिटल मीडियासाठी कार्यशाळेचे आयोजन

0
38

शनिवार, २१ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजता येथील बळीराजा पॅलेस, चामोर्शी रोड येथील संविधान सभागृह येथे न्यूज पोर्टल आणि डिजिटल मीडियासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

VNX आणि My Khabar 24 या न्यूज पोर्टलने ही कार्यशाळा आयोजित केली आहे.

या कार्यशाळेत उपस्थितांना सुप्रसिद्ध डिजिटल मीडिया तज्ज्ञ व ज्येष्ठ पत्रकार श्री.देवनाथ गंडाटे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचे विषय – डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचे महत्त्व, ऑनलाइन जाहिरात कमाईच्या टिप्स, Google AdSense कसे स्थापित करावे, न्यूज पोर्टल आणि त्यांच्याशी संबंधित कायदे, आदी राहणार आहेत. या शिवाय संवाद चर्चा होणार आहे.

या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here