गडचिरोली ते भानुप्रतापपूर ( छ, ग,) नवीन रेल्वे मार्ग सर्वे साठी मंजूर

0
65

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नांना यश
गडचिरोली:-२० जानेवारी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक  नेते यांच्या प्रयत्नाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छत्तीसगड राज्याला रेल्वे लाईनने
जोडण्याची नितांत आवश्यकता होती ही आवश्यकता आता पूर्ण होणार आहे दळणवळनाच्या दृष्टीकोनातून व व्यापार पेठ दृष्टीकोनातून या रेल्वे लाईनला फार महत्व आहे कारण छत्तीसगड राज्यातील येथील अनेक व्यावसायिक गडचिरोली येथे व्यवसाय करण्यास इच्छुक आहे व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक छत्तीसगड राज्यात व्यवसाय करण्यास इच्छुक आहे त्यामुळे मध्यप्रदेश छत्तीसगड आणि या मधे व्यापार पेठ अधिक दृढ होणार आहे व दळणवळण वाढणार आहे
आधीच गडचिरोली ते सीरोंचा रेल्वे लाईन मंजूर झाली आहे सदर पुढील आवश्यक प्रशासकीय कार्य केंद्र व राज्य सरकार द्वारे संयुक्तपणे सुरू आहेत तसेच वडसा ते गडचिरोली रेल्वे लाईन मंजूर झाले आहे सदर रेल्वे लाईन करिता जमिनीचे अधिग्रहण युद्धस्तरावर सुरू आहेत व विशेष म्हणजे खासदार अशोक  नेते यांच्या प्रयत्नाने प्रामुख्याने नुकताच गडचिरोली ते
भानुप्रतापपूर नवीन रेल्वे लाईन साठी सर्वे मंजूर झाल्या बद्दल गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचे गडचिरोली व छत्तीसगड राज्यातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here