गडचिरोली :- गोटूल भूमी येथील आयोजित अप्पर डिप्पर प्रीमियर लीग व करंडक क्रिकेट स्पर्धेचा समारोप कार्यक्रम उद्या 26 जानेवारीला पार पडणार आहे समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गडचिरोली विधानसभाचे आमदार देवराव होळी तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे,माजी उपसभापती विलास दशमुखे व माजी नगर सेवक प्रमोद पिपरे संघमालक बलराम सोमनानी, डॉ यशवंत दुर्गे, निखिल मंडलवार, अनुराग पिपरे आदी मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी दुपारी 4 वाजता विजेत्या संघाना पारितोषिक देण्यात येणार आहे
अप्पर डिप्पर प्रीमियर लीग मध्ये भंडारेश्वर फोर्ट,चपराळा फ़ॉरेस्ट,गुरवळा सफारी व मुतनूर मॅजिक संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत भंडारेश्वर आणि चपराळा या दोन संघात अंतिम सामना दुपारी 12 वाजता रंगणार आहे तर करंडक क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यासह 48 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी सामान्य रुग्णालय संघ व ओम गणेश मंडळ संघाची स्पर्धेच्या अंतिम सामान्यात मजल मारली असून उद्या गुरुवारी दुपारी 1:30 वाजता या दोन्ही संघात अंतिम सामना रंगणार आहे.तर तिसऱ्या व चवथ्या स्थानासाठी जय बजरंग संघ व गडचिरोली क्रिकेट क्लब या दोन संघात दुपारी 3 वाजता झुंज होणार आहे.