नक्षलग्रस्त व नक्षलपिडीतांच्या मागण्यांचा पाठपुरावा पूर्ण शक्तिनिशी करणार:-आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली नक्षलग्रस्त व नक्षलपिडीतांच्या साखळी उपोषणाला भेट

0
44

नक्षलग्रस्त व नक्षलपिडीतांच्या मागण्या तातडीने पुर्ण कराव्यात यासाठी संघटनेच्या शिस्टमंडळासह आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतली पोलीस अधीक्षक यांची भेट

उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर पोलिस अधीक्षक यांनी दिले समाधानकारक उत्तर

दिनांक २७/१/२०२३ गडचिरोली:-नक्षलग्रस्त व नक्षल पिडित संघटना गडचिरोलीच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मार्गदर्शनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व नक्षलपिडितांच्या तसेच आत्मसमर्पित नक्षलवादी यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात याकरिता २७ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.या साखळी उपोषणाला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भेट दिली व नक्षलग्रस्त व नक्षल पिडित संघटनेच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असे आश्वासन त्यांनी उपोषणकर्त्याना दिले.

याप्रसंगी नक्षलग्रस्त व नक्षल पिडित संघटना गडचिरोलीचे अध्यक्ष श्री नरेंद्र पुंघाटी, सचिव मनोज कांदो, संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपोषण स्थळी उपस्थित होते.

नक्षल ग्रस्त व नक्षल पिडितांच्या कुटुंबाला शासकीय भूखडांमध्ये घर बांधून देणे ,कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी रोजगाराची साधन म्हणून नोकरीत समाविष्ट करणे, एसपीओंना कमी न करता त्यांच्या मानधनात वाढ करणे व नियमित मानधन देणे, नक्षलवाद्यांमुळे उध्वस्त झालेल्या घरादारांना केंद्र तसा राज्य सरकारच्या योजनांचे लाभ मिळवून देणे , त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देणे, ग्रस्त व पीडितांना रेशन कार्ड बनवून देणे , नक्षल्यांकडून मारल्या गेलेल्या कुटुंबातील व्यक्तीला शासनाने कडून ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देणे, , बंद केलेल्या एसपीओंना नियमित मानधन सुरू करणे,अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती नक्षलग्रस्त व नक्षल पिडीत संघटनेच्या वतीने देण्यात आली.

नक्षलग्रस्त व नक्षल पिडीत , आत्मसमर्पित नक्षल यांच्या मागण्या तातडीने पुर्ण कराव्यात यासाठी शिस्टमंडळासह आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतली पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली व त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. उपोषण कर्त्यांच्या त्यातील मागण्यांवर पोलिस अधीक्षक यांनी समाधानकारक उत्तर दिल्याने उपोषण कर्त्यानी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here