गृहलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेला प्रथम पुरस्काराने केले सन्मानित

0
38

गडचिरोली:-विदर्भ क्रेडिट को-आपरेटीव्ह सोसायटीज फेडरेशन ली.अमरावती तर्फे गोंदिया येथे दोन दिवसीय कार्यशाळा व पतसंस्था पुरस्कार वितरण सोहळा 22 व 23 जानेवारीला घेण्यात आला.यावेळी गडचिरोली जिल्ह्यातून गृहलक्ष्मी महिला नागरी पतसंस्थेला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण अर्जुनकर,घनश्याम भांडेकर,छगन बट्टे यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.विदर्भातील नामांकित पतसंस्थांनी आदर्श पतसंस्था पुरस्कार व कार्यशाळेत सहभाग घेतला होता.अध्यक्षस्थानी विदर्भ क्रेडिट को-आपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप राजूरकर होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वसुली अधिकारी प्रकाश जाधव,संचालक adv स्वप्नील मोंडे,adv जयसवाल,चार्टड अकाऊंट राम हेडा आदी उपस्थित होते.वित्तीय वर्ष 2021-22 या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातून गृहलक्ष्मी महिला नागरी पतसंस्था आणि दी गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थने सहभाग घेतला होता.या मध्ये गृहलक्ष्मी सहकारी पतसंस्थेची जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कारासाठी निवड झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here