अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळूमाफिया व यांना पाठीशी घालणाऱ्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा याविरोधात उपोषण करणार – आमदार डॉ देवराव होळी
चामोर्शी:-चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात करण्यात येणाऱ्या अवैध वाळू उत्खननाचा पर्दाफाश गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ देवराव होळी यांनी दोटकुली घाटावरील वैनगंगा नदीपात्रात प्रत्यक्ष भेट देउन केला.तहसीलदार, मंडळ अधिकारी व स्थानीक तलाठी यांच्या वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे वाळू माफियानी करोडो रुपयांच्या अवैध वाळूचे उत्खनन करून त्याचा साठा केला व विक्री केली यामुळे मोठया प्रमाणात शासनाचा महसूल बुडाला असून वाळूमाफिया गब्बर झाले आहेत. तसेच शेतीच्या जागेचा सातबाऱ्याचा आधार घेऊन मोठ्या प्रमाणात वाळू साठा केला जात आहे.दिनांक 30 जानेवारी ला रात्री बारा वाजता आमदार डॉ होळी साहेब स्वतः या रेती घाटावर येऊन पाहणी केली.हे अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी महसुल प्रशासनाने वाळू माफियाविरुद्ध कडक कारवाई करावी तसेच यांनी अवैध वाळू तस्करीतून जी कोट्यवधीची माया जमविली आहे यासाठी त्यांच्या बँक खात्याची चौकशी करण्यात यावी व यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी जबाबदार असलेल्या प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाच दिवसांच्या आत चौकशी करण्यात यावी अन्यथा मी याविरोधात उपोषण करणार असल्याचा इशारा डॉ होळी साहेब यांनी दिला. यावेळी उपविभागीय अधिकारी चामोर्शी, पोलिस निरीक्षक चामोर्शी, तलाठी दोटकुली, भुवनेश्वर चुधरी ग्रा. प. सदस्य, श्री. नलेश पोरटे, मधुकर बोधलकर उपस्थित होते.