माजी आमदार करणार तेलंगाना येथील भारत राष्ट्र समिती सोबत घरोबा

0
39

गडचिरोली:मिलिंद खोंड

दक्षिण गडचिरोली भागात दबदबा असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दीपक आत्राम यांनी आता भारत राष्ट्र समिती सोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतला आहे ते येत्या पाच फेब्रुवारी ला नांदेड येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती वर्तवली आहे
माजी आमदार दीपक आत्राम यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक ही काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती हे विशेष याआधी भारतीय जनता पार्टी प्रवेश करायच्या त्यांच्या वावळ्या उठत असतानाच त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्याची माहिती मिळताच राजकीय विश्लेषकांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रातही आमदार व खासदार च्या काही जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे

  1. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात अहेरी येथील माजी आमदार दीपक आत्राम यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या ५ फेब्रुवारीला नांदेड येथे होणाऱ्या सभेत ते अधिकृतरित्या बीआरएसमध्ये प्रेवश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळू शकते.
    तेलंगणा राज्य निर्मितीसाठी लढा देणाऱ्या मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर भारत राष्ट्र समिती असे नामकरण करण्यात आले. भविष्यात विस्ताराच्या दृष्टीने या पक्षाकडून महाराष्ट्रातील काही जागा लढविण्यात येणार आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेचा समावेश असून माजी आमदार दीपक आत्राम येत्या ५ फेब्रुवारीला नांदेड येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत, अशी माहिती आहे.
    दीपक आत्राम यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेटदेखील घेतली होती. अहेरी विधानसभेचा बराचसा भाग तेलंगण सीमेला लागून असल्याने त्या भागात तेलगू भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बीआरएसने त्या भगावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने माजी आमदार दीपक आत्राम यांच्या प्रवेशाने पक्षाला बळ मिळू शकते, असे राजकीय जाणकार सांगतात. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांसमोर नवे आव्हान उभे राहणार, हे निश्चित.
    विशेष म्हणजे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत हे मात्र अनिश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here