ऑल इंडिया क्रॉसबो स्पर्धेत अहेरीच्या श्रुतीका ला सिल्वर मेडल

0
31

अहेरी:-ऑल इंडिया क्रॉसबो स्पर्धा एकलव्य स्पोर्ट्स स्टेडियम आग्रा, उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडली द्वितीय संसद खेल स्पर्धा केंद्र शासना तर्फे आयोजित करण्यात आली होती. त्या मध्ये महाराष्ट्रा सहित सात राज्य सहभागी झाले. त्या मध्ये तामिळनाडू, तेलंगणा, आंद्रा प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा अशा राज्याचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या स्पर्धेत तीन गोल्ड मेडल जिंकले. पाच सिल्वर मेडल तर तीन ब्राँझ मेडल जिकंले. महाराष्ट्र क्रॉसबो शूटिंग चे सचिव संजय पारधी बालाजी हायस्कूल ची सहाव्या वर्गाची खेळाडू पायल पाचरे ने गोल्ड मेडल जिंकले. अकोला जिल्यातील निर्मन नरवाडे नी गोल्ड मेडल जिकंले.रिपब्लिकन इंग्लिश मेडीयम स्कूल, अहेरी ची माजी विद्यार्थीनी सध्या दिलासाग्राम कॉन्व्हेंट स्कूल ची वर्ग सात ची श्रुतिका कोसरे अहेरी, गडचिरोली जिल्यातील एकमेव खेळाळू ने महाराष्ट्रातून सिल्वर मेडल जिकंले. अशा प्रकारे द्वितीय संसद खेल स्पर्धा जी एकलव्य स्पोर्ट्स स्टेडियम आग्रा इथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कंपाऊंड रिकव्हर कॅटगरी मध्ये 11 पद के जिंकली. त्यामुळे सर्वत्र खेळलुना कौतुकाची थाप दिली जात आहे अहेरी शहरातील क्रॉसबो खेळामध्ये प्रथम मेडल मिडवणारी स्पर्धक ठरली. तिचे दिलासाग्राम स्कूल च्या प्रिन्सिपॉल सिस्टर कडून कौतुक व सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here