गडचिरोली ग्रंथोत्सव -2022 चे 7 व 8 फेब्रुवारी रोजी आयोजन

0
41

गडचिरोली,(जिमाका)दि.06:- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,गडचिरोली शिक्षण विभाग (माध्यमिक) जि.प. गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 व 8 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय गडचिरोली ग्रंथोत्सव -2022 चे आयोजन जिल्हा परिषद शाळा चामोर्शी रोड,गडचिरोली येथे करण्यात आले आहे. भव्य ग्रंथ प्रदर्शन व विक्री आणि साहित्यिक-सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वासांठी विनामुल्य प्रवेश असून सर्वांनी विविध कार्यकमांना उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
दिनांक 7 फेब्रुवारी रोजी ग्रंथ दिंडी शुभारंभ सकाळी 8.30 वा. गांधी चौक ते कार्यक्रमस्थळ, स्थळ जिल्हा परिषद हायस्कूल,चामोर्शी रोड, गडचिरोली, सकाळी 11.00 वा. उद्घाटन समारंभ, दुपारी 1.00 ते 4.00 वा. परिसंवाद नवे ऑनलाईन तंत्रज्ञान समाजमाध्यम युवा पिढीसाठी घातक की सहाय्यक, सायंकाळी 5 .00 ते 8.00 वा परिसंवाद सांस्कृतिक कार्यक्रम. दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वा.मार्गदर्शनपर कार्यक्रम स्पर्धा परीक्षा तयारी चिंतन मंथन. दुपारी 3.00 वा. समारोप आणि पुरस्कार वितरण होणार आहे असे प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी, रामदास साठे, तथा ग्रंथोत्सव समन्वय समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here