गडचिरोली:- उद्या 7 फरवरी ला दुपारी 1 वाजता विद्या भारती कन्या हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली येथे होणाऱ्या श्रद्धेय स्व. गोविंदराव मुनघाटे यांच्या आदर्श शिक्षणाच्या संकल्पनेतून सन १९७२ साली अस्तित्वात आलेल्या गडचिरोली येथील ‘दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेचे सन २०२२ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष होते. हे औचित्य साधून संस्थेच्या विविध घटक संस्थातील शाळा, महाविद्यालय, वसतिगृह व वाचनालयातील विद्यार्थी- शिक्षकांनी मागील वर्षभर अतिशय उत्साहाने अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले होते. नामवंत वक्ते व कलावंतांच्या उपस्थितीने वर्षभर सुवर्ण महोत्सवी वर्ष दंडकारण्य परिवाराने साजरे केले.या समारंभाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. अभय बंग संचालक शोधग्राम,मुख्यअतिथी रंगनाथ पठारे ज्येष्ठ साहित्यिक,राजन गवस सुप्रसिद्ध कादंबरीकार,डॉ. नंदकुमार मोरे मराठी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला.प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे,अध्यक्ष.देवाजी नरूले ,उपाध्यक्ष.
पांडूरंग पा. म्हशाखेत्री, सदस्य.
नामदेव बानबले, सदस्य.डॉ. प्रमोद मुनघाटे,सचिव.
प्रा. अरविंद बंदे, सदस्य.सुरेश लडके, सदस्य.
अनिल मुनघाटे,सहसचिव.प्रा. सुग्रीव दूधमोचन,सदस्य.
सौरभ मुनघाटे,सदस्य हे उपस्थित राहणार असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हाहन
सुवर्ण महोत्सव समारंभ समिती व दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली यांनी केले आहे.
संस्थेचे उपक्रम!
श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय, कुरखेडा विद्याभारती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली.
कमलाताई मुनघाटे जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली. विद्याभारती हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, पुराडा, ता. कुरखेडा.
विद्याभारती हायस्कूल, गोगाव, ता. जि. गडचिरोली विद्याभारती हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय आंबेशिवणी.
आश्रम शाळा, चांदाळा, ता. जि. गडचिरोली.
आश्रम शाळा, मुरमाडी, ता. जि. गडचिरोली.
रामनगर प्राथमिक शाळा, गडचिरोली प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट, कॉम्प्लेक्स, गडचिरोली.
जिजामाता मुलींचे वसतीगृह, गडचिरोली.
जिजामाता महिला वाचनालय, गडचिरोली.
कै. वा. ना. मुनघाटे वाचनालय, गिरोला, ता. धानोरा, जि. गडचिरोली.
मान्यवरांच्या हस्ते होणार प्रकाशन सोहळा
‘दंडकारण्य वृक्ष- कांचन’ स्मरणिका ‘शोध काटेमुंढरीचा’: संपादन डॉ. नंदकुमार मोरे