वैरागड येथे कबड्डी स्पर्धेत सिलेझरी, गोंदिया येथील छत्रपती संघाने पटकविले पहिले बक्षीस..! तर राजमुद्रा संघ वैरागड हा ठरला उपविजेता .

0
46

आरमोरी:- आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे राजमुद्रा कबड्डी क्लब च्या वतीने 1 फरवरी पासून भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आज दिनांक 6 फरवरी ला या कबड्डी सामन्याचे समारोप झाले या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोली चे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री मिलिंद भानारकर यांचे हस्ते विजेत्या संघाला बक्षीस देण्यात आले.पहिले बक्षीस हे 33000 हजार रुपये रोख हे गोंदिया जिल्ह्यातील सिलेझरीचे छत्रपती संघाने पटकाविले आहे तर दुसरे बक्षीस 23000 रुपये रोख हे वैरागड येथील राजमुद्रा कबड्डी संघाने पटकावले. तर तिसरे बक्षीस रोख रुपये 13000 हजार हे महाराणाप्रताप गडचिरोली च्या कबड्डी संघाने पटकावले आहे या कबड्डी स्पर्धेत एकूण 32 संघाने सहभाग घेतला होता त्या पैकी वरील संघ हे विजेते ठरले या बक्षीस वितरण कार्यक्रमाला वैरागडचे सरपंच संगीता पेंदाम,उपसरपंच भास्कर बोळणे,सामाजिक कार्यकर्ते दत्तूजी सोमनकर,गडचिरोलीचे सामाजिक कार्यकर्ते अनिल भोयर,सा. कार्यकर्ते गडचिरोली चे संजू मेश्राम,राजमुद्रा कबड्डी क्लब चे अध्यक्ष वाल्मिक नेवारे, सचिव राहुल भानारकर,अंकित बोधनकर,प्रमोद कोडाप, अंकीत घुबडे,ओम आकरे,निखिल मोहूर्ले आदी पाहुणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here