गडचिरोली: सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा सोनार समाज गडचिरोली तर्फे बुधवार, ८ फेब्रुवारी रोजी चामोर्शी रोड वरील केमिस्ट भवन येथे मोठ्या उत्साहात घेण्यात आले.सुरवातीला सकाळी 5 वाजता श्री गुरुदेव सेवा मंडळा तर्फे ध्यान धारणा करण्यात आली.त्याचे नंतर सकाळी 9 वाजता रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.व 10 वाजता श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.दुपारी 12 वाजता पालखी मिरवून गडचिरोली शहरातुन चामोर्शी रोड ते गांधी चौक,राममंदिर, आरमोरी रोड वरून पुन्हा केमिस्ट भवन मध्ये पालखी चा समोरोप करण्यात आला.नंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.अध्यक्ष स्थानी सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष बंडूजी कारेमोरे,विशेष अतिथी म्हणून विजय खरवडे जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास,गजेंद्र डोमळे,समाजाच्या महिला उपाध्यक्षा अल्का खरवडे,वनिता खरवडे,गुरुदेव सेवा मंडळाचे नानाजी वाढई हे प्रामुख्याने उपस्थित होते.दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आले व सोनार समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समाजातील 75 वर्षाच्या वरील 9 वृदांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.समाजातील मुला-मुलींचे 10 वी व 12 वित प्राविण्य गुण घेतलेल्यांचा सिल्ड व प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आले.वक्तृत्व स्पर्धा,गीत गायन स्पर्धा,डान्स स्पर्धा घेण्यात आली व पहिला व दुसरा बक्षीस देण्यात आले.सोनार समाजाची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली,संध्याकाळी महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राकेश इनकणे व दिलीप काळबांधे यांनी केले.या कार्यक्रमाला सुरेश भोजापुरे,डेडुजी बेहरे, अशोक हाडगे,प्रमोद बेहरे,दत्तायत्र खरवडे, जगदिश डोमळे,रमेश भरणे,अरुण पोगळे, नामदेवराव काळबांधे,रामभाऊ काळबांधे,राजूभाऊ कावळे, अनिल हर्षे,सचिन हर्षे,नितीन हर्षे,पंकज हर्षे,श्रीकांत डोमळे,ललित पोगळे, भरणे,,पुरुषोत्तम कुर्वे,किशोर डोमळे,आशिष भरणे,तानाजी पालकर,प्रा.स्वप्नील ढोमने, अभिलाष डोमळे,वृषाली हर्षे,स्वेता भरणे,कल्पना काळबांधे,मीनाक्षी खरवडे,माया भोजापुरे,विभा बेहरे, सविता डोमळे,शुभांगी काळबांधे,वंदना हर्षे,वैशाली भजने,वैशाली काळबांधे,शालिनी भरणे,जयश्री हर्षे,सुषमा बेहरे,विजया पोगळे,संध्या पोगळे,कल्पना पोवरे आदींनी सहकार्य केले.