लायड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड ही बेरोजगारांच्या हाताला काम देणारी कंपनी!

0
53

पहिले पण एक बॅच टाटानगर ला रवाना झाली होती..!

लायड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी चा उपक्रम

एटापल्ली:-गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर लोह खनिजाचे उत्खनन सुरू करण्यासाठी प्रशासनाला तब्बल दोन दशके वाट पहावी लागली, खनिकर्म विभागाकडून रीतसर परवानगी देण्यात आली.व सुरजागड लोह प्रकल्पामध्ये चांगल्या प्रकारचे कामगार तयार करण्याकरिता याच भागातील स्थानिक बेरोजगार युवकांना नवीन रोजगाराची संधी उपलब्द करून देण्यासाठी लायड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी मार्फत शेकडो युवकांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे अग्निशमन प्रशिक्षनासाठी 39 व हलक्या वाहतुकीसाठी 53,प्रशिक्षण केंद्र छिंदवाडा हाटेल मॅनेजमेंट साठी 26 आणि तुमसर प्रशिक्षण केंद्रा मध्ये उत्खनन कामगार म्हणून 17,वेल्डर 5,डोझर आपरेटर 10,इलेक्ट्रीशन साठी 31,इत्यादी प्रकारच्या पहिल्या व दुसऱ्या टप्यातील असे एकूण 181 प्रशिक्षणार्थीना तयार होण्यासाठी आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील गरजू युवकांना पाठविण्यात कंपनी ने पाहुल उचलले आहे. पुन्हा गरज पडल्यास अनेक युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी बाहेर पाठवून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम देणार असल्याचे कटिबद्ध आहोत असे कंपनी ने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here