गडचिरोली:-डचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका येथील पोटेगाव ते कोटमी रस्त्याचे व फुल्याचे बांधकाम पॅकेज क्रमांक 1030 या कामात लाखोचा भ्रष्टाचार झाल्याचा दिसून येत आहे या कामाचे अधीक्षक अभियंता व उपविभागीय अभियंता यांच्या आशीर्वादाने कंट्रक्शन कंपनीचे मालक एम एस वालिया या कामात लाखोचा भ्रष्टाचार केला असून संबंधित अधिकारी सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता यांच्याकडे तक्रार दाखल केली असताना सुद्धा तक्रारीला केराच्या टोपलीत टाकण्यात आलेली आहे
या अनुषंगाने भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याकरिता 1/3/ 2023 ला आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्यात येत आहे या भ्रष्टाचाराच प्रकरणात असणारे अधिकारी यांची ईडीमार्फतीने चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागणीसह कॉन्ट्रॅक्टर एम एस वालिया यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून परवाना रद्द करण्यात यावा
रस्त्याचे व पुल्ल्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागणी धरून मुंबई येथे होणाऱ्या अधिवेशन च्या काळात आमरण उपोषण करण्यात येत आहे
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी व आशिष अग्रवाल तालुकाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष रोशन कवाडकर व मनीष डोंगरे आणि महेंद्र ठाकरे तसेच संपूर्ण सहकारी उपोषण करीत असल्याचे पत्रात म्हटले आहे.