नामवंत विधीतज्ञ ॲड. कविता मोहरकर काँग्रेसच्या गोटात…! लोकनेते माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश.

0
34

गडचिरोली-देशात सद्या अराजकतेचे वातावरण निर्माण झाले असुन नागरिकांच्या मुलभुत गरजा पूर्ण करणे कोणत्याही सरकारचे ध्येय धोरण असणे गरजेचे असताना विकासाच्या नावाखाली सर्व सामान्य गोरगरीबांची करण्यात येत असलेली दिशाभूल भावी पिढीच्या दृष्टीने घातक ठरू लागली आहे.अशाही स्थितीत लोकनेते काँग्रेसचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार सातत्याने प्रयत्नशील असुन त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे करण्याचा सपाटा लावला आहे.त्यांचे नेतृत्व सर्व सामान्य गोरगरीबांना न्याय देणारे असल्याने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन गडचिरोली जिल्ह्यातील नामवंत विधीतज्ञ ॲड.कविता मोहरकर यांनी काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश केला आहे.
यावेळी माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.रामभाऊ मेश्राम,सावलीच्या नगराध्यक्षा उषा लाकडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव कुणाल पेंदोरकर,धानोरा नगर पंचायतचे उपाध्यक्ष ललीत बरचा यांच्यासह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
देशात एकंदरीत निर्माण झालेली स्थिती पाहु जाता देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही.प्रादेशिक पक्षांच्या बळावर देशातील युवा पिढीला बरबादीच्या खाईत ढकलण्याचे पाप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतुन बाहेर घालवणे शक्य नाही.यासाठी सर्व धर्म समभावाची विचारधारा प्रभावीपणे अंमलात आणण्याचे काम फक्त काँग्रेस पक्षच करू शकत असल्याने यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आमदार वडेट्टीवार यांचे हात बळकट करणे गरजेचे असल्याचे ओळखून ॲड.मोहरकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे सांगितले.
ॲड.मोहरकर ह्या गडचिरोली जिल्ह्यातील नामवंत विधीतज्ञ असुन मागील काही वर्षापासून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे.महिला सक्षमिकरणाच्या माध्यमातून महिला संघटन निर्माण करून त्यांना राजकीय व वैचारिक दृष्ट्या सक्षम करण्यात त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या असुन यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील देखिल आहेत.त्या उत्तम प्रवक्त्या असुन बहुजनांच्या हितासाठी त्या परखड विचार व्यक्त करून मन से मन जोडो हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. त्या करीता करीत असलेले अलौकिक कार्य पाहुन त्यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्ष बहुजनांना एकवटण्यात अधिक प्रभावी ठरेल,असे मत आमदार वडेट्टीवार यांनी ॲड. मोहरकर यांच्या पक्ष प्रवेशावेळी सत्कार करताना व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here