आलापल्ली येथील मतिमंद विद्यालयाच्या कशिषचा पुणे येथील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत डंका.

0
46

गडचिरोली,:

चाणक्य निवासी मतिमंद विद्यालय आलापल्ली येथील विद्यार्थिनी कशिष लेकामी हिने पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे राज्यस्तरीय 100 मीटर धावणे स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातून मतिमंद प्रवर्गामधून तिसरा क्रमांक पटकावला आहे .
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तिचा चाणक्य निवासी मतिमंद विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक दिनेश भुसकुडे, तुला शिक्षक हंसराज आटे, अधीक्षक सुरेश नारनवरे परिचारिका योगिता माहुरे तसेच विद्यालयाचे शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती तिच्या या कामगिरीबद्दल परिसरात सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here