अखेर विजया महिला नागरी सहकारी पतसंस्था प्रकरणातील फरार आरोपीस सिंदेवाहीतून अटक सात दिवसांची पोलीस कस्टडी, अजूनही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

0
83

गडचिरोली :- विजया महिला नागरी सहकारी पतसंस्था गडचिरोली येथे लाखो रुपयांची अफरातफारी करणारा आरोपी मंगेश महादेव नरड 46 वर्षे रा. खरवड ता. वरोरा जिल्हा चंद्रपुर याला अखेर गडचिरोली पोलिसांना शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथून अटक करण्यात यश आले. पोलिसांना नरड याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
गडचिरोलीच्या गोकुलनगर येथे विजया महिला नागरी पतसंस्थेत नरड अभिकर्ता तसेच व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता या दरम्यान दिनांक 13.08.2016 ते दिनांक 27.01 2023 दरम्यानचे कालावधीत मुदतबंद ठेवी स्वरुपातील मुल्यावान रोखे, दैनिक पिग्मीबचत योजनांचे पासबुक गैरमार्गाने वापरुन सदरचे मुल्यवान रोखे त्यावर पतसंस्थेचे अध्यक्षा यांच्या खोटया स्वाक्ष-या करुन बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांनी एकुन 67,31,650/- रुपयांची आर्थीक फसवणुक केली. याबाबत फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन गडचिरोली येथे दिनांक 20.02.2023 रोजी अप.क्र. 132/2023 कलम 406, 409, 467, 420, 468, 471 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अरविंदकुमार डी. कतलाम पोलीस हे करीत आहोत.

पतसंस्थेमध्ये गुंतवणुक केलेल्या मुदतबंद ठेवीचा कालावधी पुर्ण झाल्याने संबंधीत गुंतवणुकदार हे संबधीत एजंट कडे पैशाची मागणी करायला सुरुवात केली असता यातील आरोपी हा दिनांक 30.01.2023 पासून यातील त्याचा स्वतःचा तसेच आपले पत्नीचा सुध्दा मोबाईल बंद करुन गडचिरोली येथील फरार झाला. नमुद प्रकरणात त्याचे विरुध्द गुन्हा नोंद झाल्याचे चाहुल लागल्याने आरोपी पोलीसांची दिशाभुल करुन वेगवेगळया ठिकाणी वास्तव्य करीत होता.मात्र नमुद गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांनी तपासाचे चक्र फिरवून अखेर शुक्रवारी फरार आरोपीला अटक केली. दिनांक 25.02.2023 रोजी मा. न्यायालया समक्ष हजर करुन नमुद आरोपीचा दिनांक 25.02.2023 ते दिनांक 04.03.2023 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करवुन घेतला आहे. नमुद गुन्हयात सक्रिय असलेल्या इतर आरोपीतांची भुमीका व सहभाग आहे का याचाही तपास पोलीस करीत आहेत. या प्रकणात अजूनही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जातं आहे. ज्या गुंतवणुकदारांची आर्थीक फसवणुक झाली आहे त्यांनी तपासी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here