आलापल्ली येतील नविन बस स्थानकाचा कामाची माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम ह्यांनी केली पाहणी..!!

0
39

अहेरी:-आलापल्ली शहर हे अहेरी विधानसभा क्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाण असून प्रमुख मार्ग येतूनच जातात शिवाय प्रवाशांची नेहमीच गर्दी असते, ह्या ठिकाणी प्रशस्त बस स्थानक नसल्याने प्रवाशांना, विद्यार्थ्यांना रस्तावर उभे राहिल्याने मोठी गैरसोय होत होती, ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम ह्यांनी विशेष प्रयत्न करून आलापल्ली येते जवळपास साडेतीन कोटी रुपयांची निधी मंजूर करून नवीन बस स्थानक मंजूर केले होते, महसूल विभागाकडून जागाही उपलब्ध करून दिली होती ह्या कामाचे भूमिपूजन ही २०१९ मद्येच राजे साहेबांनी केले होते..!!
आलापल्ली बस स्थानकाचे काम सद्या ९०% पूर्ण झाले असून नुकताच आलापल्ली दौऱ्यावर असतांना माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी ह्या कामाची स्वतः पाहणी करून पूर्ण माहिती घेतली तसेच कामाबद्दल समाधान ही व्यक्त केले ह्यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here