होळीसाठी गावी आलेल्या युवकाची नक्षलवाद्यांनी केली हत्या.

0
56

गडचिरोली:10मार्च

होळी साठी गावी आलेल्या युवकाची नक्षल्याकडून गोळी घालून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस खबऱ्या असल्याचा संशयावरून हत्या करण्यात आली असावी असा अंदाज आहे. भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंद्रांतर्गत क्षेत्रातील मर्दहूर हे गाव आहे. मर्दहूर येथील साईनाथ नरोटे वय 26 या युवकाची नक्षल्यांनी गोळी घालून हत्या केली. पोलीस घटनास्थळ गाठून मृतदेह दुपारपर्यंत भामरागडला आणणार आहेत. साईनाथ नरोटे हा गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. होळीच्या सुट्टीला तो आपल्या गावाकडे गेले होता. नक्षल्यांनी त्याला घरून उचलून नेऊन गोळी घालून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here