अहेरी तालूक्यातील छल्लेवाढा या गावात यशोदाबाई पोमा अजमेरा हीचे घराला अचानक आग लागून घर संपूर्ण शंभर टक्के जळून भस्मसात झाले असून घरात आग लागली तेंव्हा गावात लग्न कार्यक्रम असल्यामूळे आई व दोन बहीणी लग्णाकरीता गेलेले होते. घरा शेजारी असलेले व्यक्तींचे आरडाओरडा मूळे संपूर्ण गावातील लोक मोठ्या प्रमाणात जमा झाले व आग विझविण्यासाठी जवळपास दोन ते तीन तास लागले तो पर्यंत घरात असलेले दोन तीन तोले सोनं व काही पैसै आगीत जळून भस्म झाले आहे तरी शासन संबंधीत वस्तू स्थितीचे अभ्यास करून संबंधीतांना लवकरात लवकर सानूग्रह व घरकूल तयार करण्यात करीता अर्थीक दरतूदीचे नियोजन करावी असे तालूका काॅग्रेस पार्टी अहेरी चे अध्यक्ष डॉ.निसार हकीम व रज्जाक भाई तालूका उपाध्यक्ष श्री नामदेव आत्राम किसान सेल , श्री मधूकर सडमेक अनू जमाती सेल , अशोक आईंचवार व्यापारी संघटना , राघोबा गौरकार ओ. बी. सी. सेल, श्री रामप्रसाद मूंजमकार तालूका उपाध्यक्ष यांनी मंडळ अधिकारी सिडाम साहेबांना सांगण्यात आले. सहानुभूती म्हणून अहेरी तालुका काँग्रेस कमिटी कडून आर्थिक मदत करण्यात आली, सर्वप्रथम भेट दिल्याबद्दल कुटुंबीयांनी आभार मानले.