बी.आर.एस नेते दीपक आत्राम यांच्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यामुळे अनेक नेते मारणार बी.आर.एस मध्ये एंट्री

0
39

गडचिरोली:माजी आमदार तथा भारत राष्ट्र समितीचे नेते दीपक आत्राम यांनी नुकताच गोंदिया जिल्ह्याचा दौरा केला यामध्ये त्यांनी अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या.

त्यांच्या या भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात नुकतीच एन्ट्री मारलेले केसिआर राव यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती मध्ये अनेक नेते प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.
अबकी बार किसान सरकार हा नारा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री मारलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्रसमिती दिवसेंदिवस अनेक नेते प्रवेश करत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापित लोकांना यामुळे हादरा बसण्याची शक्यता आहे माजी आमदार दीपक आत्राम यांच्या गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यामुळे विविध पक्षाचे अनेक मोठे नेते गळाला लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावेळी गोंदिया येथील विश्रामगृहात झालेल्या भेटीत समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष प्रदीप दुबे नवेगाव बांध सरपंच राजकुमार सोळंखे,
ललित खजरे, अनुप गेडाम, अशोक कटरे, जीत सिंग जगणे, महेंद्र चावरे, प्रभुदास केडूत, सय्यद युसूफ आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here