माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची शील कुटूंबाला भेट देऊन उपचारास आर्थिक मदत केले.

0
50

मूलचेरा : तालुक्यातील मौजा – गोमणी येथिल सुक्रंजन शील मागील 1 वर्षांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त असून त्यांचे उपचार सुरु आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असून उपचार घेण्यास अडचण होत आहे.ही बाब भारत राष्ट्र समितीचे नेते,माजी आमदार तथा आवीस विभागीय अध्यक्ष दिपकदादा आत्राम आज मूलचेरा तालुक्यातील दौऱ्यावर असतांना आविस च्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिल्यावर दिपकदादा आत्राम यांनी शील कुटुंबाची भेट घेऊन आजाराची माहिती घेऊन विचारपूस केली व आर्थिक मदत केले.या वेळी त्यांची पत्नी मोना शील,आंबटपल्ली सरपंच उमेश कडते,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,गोमणी ग्रा.प. सदस्य शुभम शेंडे,विनोद कावेरी,प्रवीण रेषे,अजय विरमालवार सह आविस पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here