महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ऍड. कविता मोहरकर

0
24

गडचिरोली:-गडचिरोली जिल्ह्या महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी ऍड.सौ. कविता मोहरकर (लोखंडे) यांनी करण्यात आलेली आहे. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेत्ता डीसुजा, महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी मंत्री ममता भुपेश आणि प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, यांनी या नियुक्तीची यादी सोमवारी काढली.काँग्रेस पक्ष हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. महिलांच्या अधिकारासाठी पक्षाने नेहमीच भूमिका घेतली आहे. ऍड. कविता मोहरकर यांनी जिल्ह्यात समाज सेविका म्हणून काम करतांना मन से मन मिलाओ अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना जोडण्याचा काम केलं आहे. त्या उत्तम वक्त्या असून त्यांनी महिलांच्या न्याय हक्कांसाठी नेहमी आवाज उठविला आहे. त्या गडचिरोली जिल्हयात विविध संघटनांशी जोडल्या गेल्या आहेत. त्या माध्यमातून त्या महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देतात. त्या प्रख्यात नामवंत वकील सुद्धा आहेत. त्यामुळे अल्पावधीतच त्यांना जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त झाला. अजूनही त्यांचं संघटनेच्या माध्यमातून महिलांना मदत व सल्ला केंद्र सुरूच आहे. समाजकारण करीत असताना आपुलकीची नाती जोडुन काम केलं पाहिजे यावर त्यांनी भर दिला. याची दखल पक्ष श्रेष्ठीनी घेऊन त्यांना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी दिली आहे. येणाऱ्या दिवसात महिला काँग्रेसचे काम आणखी जोमाने करणार आहे असे त्यांनी सांगितले काम करणाऱ्या महिलांना प्रामुख्याने प्राधान्य देऊन द्या जिल्ह्याची महिला काँग्रेसची कमिटी देखील लवकरच तयार करणार आहेत. जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुका मध्ये महिला कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही असे सुद्धा त्यांनी सांगितलं. याच सोबत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या खासदार.आदरणीय सोनियाजी गांधी, खासदार राहुलजी गांधी. प्रियंकाजी गांधी, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेत्ता डीसुजा, महिला काँग्रेसच्या राज्य प्रभारी ममता भुपेश, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी कॅबिनेट मंत्री आ. विजयभाऊ वडेट्टीवार, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी , माजी खासदार मारोतराव कोवासे , युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार, जिल्हा प्रभारी डॉ. किरसान , जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश काँग्रेस चे सचिव रवींद्र दरेकर, हसन गिलानी,माजी आमदार आनंदराव गेडाम , माजी नगराध्यक्ष ऍड. रामभाऊ मेश्राम , माजी जी.प. अध्यक्ष बंडोपंतजी मल्लेलवार,
डॉ. कोडवते , प्रभाकरजी वासेकर,डॉ. अप्पलवार , प्रा. राजेश कात्रटवार  तसेच सर्व जेष्ठ वरिष्ठ सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना नियुक्तीचे श्रेय देऊन त्यांनी नियुक्तीसाठी यांचे सर्वांचे आभार मानले आहेत. मोहरकर यांच्या नियुक्तीने महिला काँग्रेस मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here