गडचिरोलीत साकारला मराठी चित्रपट” घाव.. एक प्रतिघात

0
76

स्थानिक कलावंतांचा समावेश

गडचिरोली:-आवड व काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असली की यश नक्कीच येतो याच जिद्दीने व चिकाटीतून गडचिरोली येथील  दिनकर चरणदास रामटेके व निकेतन दिनकर रामटेके या पिता पुत्रानी निर्मित केला मराठी चित्रपट घाव… एक प्रतिघात हा वास्तवाला आधारित ह्रदय स्पर्शी  या चित्रपटाचे लेखक तथा कलावन्त  नितीन धानोरकर आहेत तर या चित्रपटाचे दिग्दर्शक  प्रमोद रेनगाडे व सह दिग्दर्शक राजरत्न जगताप यांनी केले. सदर चित्रपटात मुख्य कलाकार म्हूणन रोहिणी रामटेके, विप्लव इंगळे,आकाश गायकवाड, नितीन धानोरकर, सरला इंगळे,विवेक मून ,राज मराठे, राजेंद्र बोबाटे, दादा सुंदकर, गजेंद्र डोमळे, रुपराज वाकोडे, प्रियंका बानबले,महेंद्र मेश्राम या सह गडचिरोली शहरातील स्थानिक कलावंतांनी आपली सुंदर अशी भूमिका साकारून या चित्रपटाला योग्य तो न्याय दिला आहे.घाव या चित्रपटाचे सम्पूर्ण चित्रीकरण हे गडचिरोली शहर व लगतचे , कोटगल, पारडी, नवेगावं,गुरवळा जंगल परिसर,वाकडी बस स्टँड या ग्रामीण भागात केले गेले  ,तर काही चित्रीकरण पुणे या ठिकाणी झाले.. एकदा तरी हा चित्रपट अवश्य आपण पाहावे असे आव्हाहन चीत्रपट निर्माते दिनकर रामटेके यांनी केले आहे.https://youtu.be/skOi1LqrNEQ चित्रपट पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here