आल्लापल्ली:- खा.अशोक नेते यांनी शनिवारी आल्लापल्ली येथे व्यापारी संघटनेसोबत सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली यावेळी व्यापारी संघटनेच्या वतीने खासदार नेते यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आलापल्ली परिसरात असलेल्या समस्या सोडवण्यासाठी खा.नेते यांना व्यापारी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली.आल्लापल्ली येथील मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात येतील,रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक्स लावून सुशोभिकरण, सोबत व्यापारी वर्गाच्या समस्या सोडविण्यावर प्राधान्य देऊ असे खा.नेते व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत म्हणाले.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे ,उपाध्यक्ष अमोल कोलपाकवार,सचिव अमित पेम्पकवार,पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड ,आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम, गंगाधर रंगू,हुसेन खान पठाण ,विनोद अक्कनपल्लीवार,रमेश गोटमवार आदींची उपस्थिती होती.