आलापल्ली : १४ एप्रिल रोजी टायगर ग्रुप तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त टायगर ग्रुप जनसंपर्क कार्यालय येथे सकाळी भव्य आरोग्य शिबिर व आयुष्मान भारत कार्ड बनवून देण्यात आले यावेळी ग्रामस्थानी याचा परेपुर लाभ घेतले .
टायगर ग्रुप नारीशक्ती (महीला गट) तर्फे बजरंग चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांन वर आधारित पुस्तके वाटप करण्यात आले .
सायंकाळी ६ वाजता आलापल्ली येथील वीर बाबुराव सेडमके चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित
आलापली येथील मुख्य चौकात डिजिटल स्क्रीन- डिस्प्ले वर लावून बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित आणि केलेल्या कार्याचा समस्त जनते पर्यंत डॉ.बाबासाहेबांचे अमूल्य विचार पोहचवण्याचे काम आलापली टायगर ग्रुपच्या सदस्यांनी केला आहे.आणि समस्त भिम सैनिकांनकडून टायगर ग्रुप ऑफ आलापली याचं जिकडे तिकडे कौतुक केलं जातं आहे…..
समस्त टायगर ग्रुप तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त केक कापून व मुख्य चौकात बटर-मिल्क वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आले.