1 मे 2023 पासून सुरुवात झाली माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे,आपल्या दवाखाना नावाने केंद्र स्थापन करण्याचे निर्देश दिले होते,, त्या निर्देशाच्या अनुषंगाने आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली , व तालुका आरोग्य अधिकारी गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका आरोग्य अधिकारी गडचिरोली यांनी शिवाजी जि प हायस्कुल च्या मागे श्री आनंद मोडक यांच्या घरी गडचिरोली तील पहिले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले त्याचे उदघाटन अशोक नेते खासदार चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र यांच्या हस्ते फीत कापून दिप प्रज्वलन करण्यात आले.
नामदार एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांचे हस्ते ऑनलाईन डिजिटल प्रणाली द्वारे लोकार्पण करून सुरू करण्याचे ठरविले होते, याकरिता सदर कार्यक्रमास समस्त जनतेने उपस्थित राहावे ही विनंती करण्यात आली होती गडचिरोली शहरातील जनसामान्य गोरगरीब व झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी पंधरावा वित्त आयोग अंतर्गत येथील जनतेला आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रावर मिळणाऱ्या सेवाप्रमाणेच काही सेवा वगळता सुविधा देण्यात येतील जसे रोग निदान व उपचार गरोदर माता बालक तपासणी बालकांचे लसीकरण, संशय रोग, व कुष्ठरोग, तपासणी रक्त,नमुने घेणे इत्यादी सेवा पुरविण्यात येईल कार्यक्रमात खालील प्रमाणे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना गडचिरोली उदघाट्न प्रसंगी चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते , गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे डॉ.देवराव होळी तसेच जिल्हा आरोग्य अधिकार जि प गडचिरोली डॉ दावल साळवे , डॉ अनिल रुडे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली, मा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ स्वप्नील बेले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ कुणाल मोडक, डॉ सचिन हेमके जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ विनोद म्हशाखेत्री, मुख्याधिकारी न प गडचिरोली श्री सूर्यकांत पिदूरकर, डॉ बगराज धुर्वे, DPM राष्ट्रीय आरोग्य अभियान डॉ राहुल थिगळे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्री राजकुमार देवके डॉ दीक्षांत मेश्राम CPHC consultant तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनिल मडावी व UPHC मेडिकल ऑफिसर डॉ सीमा गेडाम mdm यांच्या मार्गदर्शन मध्ये UPHC,UHWC आणि NHM कर्मचारी स्टाफ यांच्या उपस्थितीत उदघाट्न पार पडले