लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या खाली चिरडून दुचाकीस्वार शिक्षक ठार ,आल्लापल्ली पोलीस चौकी समोरील घटना

0
101

अहेरी :-लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या खाली चिरडून दुचाकीस्वार शिक्षक ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान आल्लापल्ली पोलीस चौकी समोर घडली

ठार झालेल्या शिक्षकाचे नाव वासुदेव कुलमेथे असे असून देवलमरी येथील भगवंतराव शाळेत कार्यरत होते अशी माहिती आहे.

आज दुपारच्या सुमारास कुलमेथे हे आपल्या दुचाकीने नागेपल्ली कडे जात असताना मागून येणाऱ्या अवजड माल वाहून नेणाऱ्या ट्रक ने मागून धडक दिल्याने चाका खाली येऊन चिरडले गेल्याने घटनास्थळी ठार झाले.
या अपघातानंतर आल्लापल्ली पोलीस चौकी समोर संतप्त लोकांनी या घटनेविषयी रोष व्यक्त केला आहे.
अपघातानंतर तणावाची परिस्थिती असून पोलीस लगेच घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here