कोनसरीमधील प्रकल्पग्रस्तांना व बेरोजगारांना तसेच लोहप्रकल्पाला परिसरातील ग्रामपंचायतीने सहकार्य करावे.

0
26

गडचिरोली:-नसरी येथील लोह प्रकल्प अनेक मुद्द्यावरती नेहमी चर्चेत असतांना दिसते आहे. यावरती सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सुरवातीपासूनच कोनसरी येथील नागरिक ही कंपनी आपल्या परिसरात व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्नशील होते. ज्या वेळेस लायड मेटल अँड एनर्जी लिमिटेड या कम्पणीला प्रकल्पासाठी जागा हवी होती. तेव्हा कोनसरी परिसरातील गावांणी जमिनीचे दर 10 ते 15 लाख रुपये एकर या प्रमाणे मागितले. तेव्हा कंपनी ने इतरत्र जागा बघण्यास सुरवात केली. अशा वेळेस हा प्रकल्प आपला परिसर सोडता इतर कुठल्याही कठिकाणी जाऊ नये व आपल्या परिसरातील बेरोजगाराना रोजगार मिळवा, या उद्देशाने कोनसरी गावातील शेतकऱ्यांनी कम्पनीने ठरविलेल्या रेट प्रमाणे म्हजेच 5 लाख रुपये प्रती एकर या दरात कम्पणीला जमिन दिल्या. तेव्हा कुठे हा प्रकल्प कोनसरी गावात उभा राहीला आणि कोनसरी परिसरातील सुशिक्षित कुशल/अकुशल बेरोजगारांना रोजाराची संधी प्राप्त झाली. आता जेव्हा रोजगार निर्माण होत आहे, तेव्हा भुमिधारक शेतकरी व गावातील स्थानिक बेरोजगार यांना प्रधान्याने रोजगार मिळायला पाहिजे. आणि नंतर कोनसरी परिसरातील इतर ग्रामपंचायत मधील बेरोजगारांना आतापर्यंत कंपनीमधे फक्त कोनसरी मधील 20% टक्के कुशल व अकुशल बेरोजगारांना रोजगार देऊ शकली आहे. कारण कंम्पनीचे एकीही युनिट आतापर्यंत सुरु झालेला नाही. अशा परिस्थितीत गावातील प्रकल्प ग्रस्त शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार हे रोजगार मिडेल या आशेने कंपनी कडे लक्ष देऊन आहेत. अश्या परिस्थितीत कोनसरी परिसरातील इतर ग्रामपंचायतीने कंपनी विरोधात रोजगारासाठी आताच मोर्चा काढणे योग्य नाही. तरी कोनसरी ग्रामपंचायती कडुन आपणास नम्र विनंती आहे की असा कुठलाही प्रकार आपण करू नये, आम्ही तुमच्या विरोधात नाही तर सोबत आहोत. आपल्याही ग्रामपंचायतिमधील बेरोजगारांना रोजगार मीळावा अशी आमची ठाम भूमिका आहे. त्याच कारणाने आताच आपल्या ग्रामपंचायत मधून जागा भरल्या जात आहेत. तसेच आपल्या गावातील स्कील बेस सुशिक्षित बेरोजगारांना किंवा लेबर म्हणून (सप्लाय) मध्ये काम करणाऱ्या बेरोजगारासाठी सुरवातीपासूनच कोनसरी ग्रामपंचायतीने कुठलेही प्रकारचे बंधन घातलेले नाही. त्यामुळेच इतर ग्रामपंचायत मधून प्रकल्पात 70% टक्के लेबर (सप्लाय) काम करीत आहेत. अशा परिस्थीती मध्ये कोनसरी ग्रामपंचायत मधील बेरोजगारांचा हक्क हिरावुन कंपणीवर मोर्चा स्वरूपात दबाव आनने हे कितपत बरोबर आहे यावर आपणच विचार करावा.
दि. २६ मे २०२३ ला कोनसरी ग्रामपंचायतीने नागरीकाच्या उपस्थीती मध्ये ठराव घेऊन असे म्हटले आहे की, जर आपण मोर्चा करीत असाल तर नायलाजाने आम्हाला आपल्या विरोधात उभे राहावे लागेल. तरी आपल्या ग्रामपंचायतिमधील आपले संबंध खराब होणार नाही व तनाव वाढणार नाही याची काळजी घेण्यात यावी. कोनसरी ग्रामपंचायत आपल्या सहकार्याच्या भूमिकेत आहे.

असे आव्हाहन श्रीकांत पावडे सरपंच, रतन आक्केवार उपसरपंच, गीता गद्दे सदस्य, सुनीता कोवे सदस्य, राकेश दंडिकवार सदस्य, विजय सिडाम सदस्य, सविता आत्राम सदस्य, वैशाली करपते- सदस्य, ललिता मोहुर्ले सदस्य, समस्त कोनसरी येथील भुमिधारक शेतकरी व गावातिल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here