धानोरा तालुक्यातील मुरुमगाव परिक्षेत्रात अवैध वृक्षतोड संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करा! रोशन कवाडकर जिल्हा उपाध्यक्ष अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती ची मागणी

0
34

गडचिरोली:- धानोरा तालुक्यातील मुरूमगाव परिक्षेत्र (पश्चिम) परिक्षेत्रातील मोजा आम पायेली कक्ष क्रमांक ५३१ येथील अवैध वृक्षतोड होऊन सुद्धा संबंधित वनाधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही
रोशन कवाडकर यांनी दिनांक १४/११/२२ ला पहिला पत्र मुख्य वनरक्षक वनवृत्त गडचिरोली यांच्याकडे दिलेला होता त्यानंतर दुसरा पत्र दिनांक ९/२/२३ व तिसरा पत्र दिनांक २०/५/२३ ला देऊन सुद्धा मुख्य वनरक्षकांनी कोणतीही कारवाई केलेली नाही या वृक्षतोडी प्रकरणात वनरक्षक, वनपाल, व वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा समावेश असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही
मुख्य वनरक्षक यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून बडतर्फ करण्यात यावी, अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती जिल्हा उपाध्यक्ष रोशन कवाडकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहेत
संबंधित अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यावर कारवाई न केल्यास मोठा आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here