गडचिरोली:- आज दिनांक 12 जून ला जागतिक बाल कामगार दिवसानिमित्त महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली व कैल्यास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन व चाईल्ड लाईन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरातील 0 ते 18 वर्षाखालील बालक हे विविध दुकानात काम करीत असल्याची माहिती महिला व बाल समितीला मिळाली त्या अनुषंगाने महिला व बाल समिती आणि कैल्यास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन व चाईल्ड लाईन आणि पोलीस विभागाच्या वतीने गडचिरोली येथील वेगवेगळ्या दुकानात धाड टाकून 21 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्या बालकांना महिला व बाल कल्याण समिती समक्ष सादर करण्यात आले.
आज जागतिक बाल कामगार दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे मा. पवार परिविक्षा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली याच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आले.व सदर धाडसत्र मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित निवासी उपजि्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, बाल कल्याण समितीचे अध्यक्षा वर्षा मनवर, सदस्य दिनेश बोरकुटे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष दिलीप बारसागडे, कैल्यास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन प्रकल्पाचे व्यवस्थापक इतिहास मेश्राम, बाल संरक्षण अधिकारी कवेश्र्वर, प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, तनोज ढवगाये चाईल्ड लाईन प्रकल्प समनवयक अविनाश राऊत, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार या टीमने गडचिरोली शहरात विविध भागात काम करणाऱ्या दुकानांत धाड सत्र राबवून गडचिरोली शहरातून एकूण 21 बालकांना ताब्यात घेऊन समिती समक्ष सादर करण्यात आले.