दि.१९ जून
गडचिरोली येथील स्वर्गीय बेहरे पेंटर यांचे काल अपघाती निधन झाले.त्यांचा अत्यंविधी कार्यक्रम कठणी नदीच्या तीरावर आयोजित करून शोकसभा घेण्यात आली.
या शोकसभेचे अध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना ,स्वर्गीय बेहरे हे माझे निकटवर्ती होते.
एखादी आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा अचानकपणे आपल्याला कायमचे सोडून देवाघरी जातात तेव्हा ते आपल्याला डोळ्यांनी कधीच दिसत नाहीत फक्त आपल्या सोबत उरतात त्यांच्या आठवणी.त्यांनी शेगाव चा अखेरचा दर्शन करून निघाले अशा वेळेस पहाटे ४ वाजता च्या सुमारास अचानक अपघात झाल्याने दुर्दैवी त्यांचा अंत झाला.
गडचिरोली मध्ये एक चांगले प्रतिभावंत, कलागुणांनी संपन्न चांगले व्यक्तिमत्व असलेले आज निघुन गेल्याची खंत खासदार अशोक नेते यांनी शोकसभेत व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
शोकसभेला उपस्थितीत जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, सामाजिक नेते चंद्रशेखर भडांगे, शहर महामंत्री केशव निंबोड, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री अनिल तिडके, स्वरूप तारकेश्वर सोनार समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष नितिन हर्ष,सामाजिक नेते प्रकाश ताकसांडे,सोनार समाज सेवा संस्थेचे उपाध्यक्ष गजेंद्र डोमळे, सचिव राकेश इनकने,सुरेश भोजापुरे तसेच मोठ्या संख्येने अत्यंविधीला नागरिक उपस्थित होते.