जिल्ह्यातील समस्त मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी महाजनसंपर्क अभियान निमित्याने तळागाळातील जनतेसोबत संवाद साधून भाजपचे विकास पर्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावावे:-खासदार अशोक नेते यांचे आवाहन!!

0
25

दिनांक २३ जुन २०२३

गडचिरोली:- गडचिरोली येथील गानली समाज सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे आज २३ जून २०२३ रोजी संयुक्त मोर्चा संमेलन संपन्न झाले या महाजनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व मोर्चा व आघाडीचे संयुक्त मोर्चा संमेलन आयोजित करण्यात आले. असून या संमेलनाचे अध्यक्ष गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते, प्रमुख पाहुणे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी ,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश भाऊ गेडाम , संयुक्त मोर्चा संयोजक अनिल भाऊ पोहनकर, जेष्ठ नेते रमेश भुरसे,जिल्हा संयोजक ,प्रशांत भुगुवार, बंगाली समाज आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,तालुका अध्यक्ष चामोर्शी दिलिप चलाख, धानोरा तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे,महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्या लताताई पुन्घाटे,महिला मोर्चाचे महामंत्री वर्षा शेडमाके, उपस्थित होते, विधानसभा क्षेत्रातील समस्त मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितांना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते ,आमदार डॉ. देवराव होळी ,प्रकाश भाऊ गेडाम संयुक्त मोर्चा संयोजक अनिल भाऊ पोहनकर, जिल्हा संयोजक प्रशांत भुगुवार यांनी मार्गदर्शन केले*
*या संमेलनाला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलतांना सांगीतले , भारत व जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार ९ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या महा- जनसंपर्क अभियान निमित्याने तमाम पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तळागाळातील सर्वसामान्य जनते सोबत संवाद साधावा व भाजपच्या वतीने देशभरात करण्यात आलेल्या विकास पर्व जनतेपर्यंत पोहचवावे असे आवाहन केले*
*या संयुक्त आघाडी मोर्चा संमेलनास गडचिरोली विधानसभा मतदार संघातील समस्त मोर्चा पदाधिकारी तथा महीला आघाडी पदाधिकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here